अमळनेर बसस्थानकात विवाहितेचा विनयभंग : चालक-वाहकाविरोधात गुन्हा

0

Female passenger molested by driver and conductor in bus station premises अमळनेर : अमळनेर शहरातील बसस्थानक परिसरात बस चालक व वाहक या दोघांकडून एका प्रवासी महिलेचा विनयभंग करण्यात आला तर पीडीतेच्या पतीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी बसचालक व वाहक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
अमळनेर बसस्थानकात कल्याणस्थित 22 वर्षीय विवाहिता पतीसह रविवार, 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता आल्या होत्या. त्यावेळी बस कोठे जात आहे,? असे विचारणा केल्याचा राग आल्याने बसचालक समाधान भगवान लांडगे व वाहक दर्शन सोमवंशी (दोन्ही रा. दहिवद, ता.अमळनेर) यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला तर महिलेच्या पतीला मारहाण केली.

दरम्यान या घटनेनंतर विवाहितनेे गुरुवारी 18 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बसचालक आणि वाहक या दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात चालक समाधान भगवान लांडगे आणि वाहक दर्शन समावेशी (दोन्ही रा.दहिवद, ता.अमळनेर) यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार हे करीत आहे.


कॉपी करू नका.