जागतिक वारसा दिनानिमित्त भुसावळात रेल्वेतर्फे रॅली

0

भुसावळ : दरवर्षाप्रमाणे यंदाही 15 ते 19 एप्रिल या कालावधीत भुसावळ विभागात जागतिक वारसा दिन साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जागतिक वारसा दिनानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीला डीआरएम ईती पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली रेल्वेच्या डीआरएम कार्यालयापासून सुरू झाली. भुसावळ रेल्वे स्थानकावरून (उत्तर दिशा) मार्गे रेल्वे स्काऊट मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत एडीआरएम सुनीलकुमार सुमन, एम.के.मीना, रोहित कुमार राजपूत यांच्यासह सर्व शाखा अधिकारी व कर्मचारी, रेल्वे शाळेचे विद्यार्थी यांच्यासह एकूण 300 कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी डीआरएम पांडे यांच्या हस्ते हेरिटेज की-चेनचे अनावरण करण्यात आले.

चित्रांचे प्रदर्शन
भुसावळ विभागात शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रेल्वे हेरिटेज वास्तू व इमारती या थीमवर चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विषयावर विद्यार्थ्यांसोबत प्रश्न स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल विभाग आणि वैद्यकीय विभागाने परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.