नातेवाईकांच्या नावांची ओळख सांगत अमळनेरातील वयोवृद्धाकडील अंगठी लांबवली

0

The ring from the old man in Amalnera was extended by telling the names of the relatives अमळनेर : दवाखान्याचे काम आटोपून बसस्थानकावर आलेल्या 80 वर्षीय वयोवृद्धाला भामट्याने बोलण्यात गुंतवत काही नातेवाईकांची नावे सांगितली व हातातील पाच ग्रॅमची अंगठी घेवून पलायन केले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोलण्यात गुंतवत लांबवली अंगठी
धरणगाव तालुक्यातील बिलाखेड गावातील दत्तू खंडू पाटील (80) हे वयोवृद्ध 8 मार्च रोजी अमळनेर शहरात दवाखान्याच्या कामाला आले असता काम आटोपून बसस्थानकात आले. यावेळी भामट्याने दत्तू पाटील यांच्याशी ओळख केली, त्यांच्या काही नातेवाईकांची नावे सांगितल्याने दत्तू पाटील यांना ती व्यक्ती ओळखीची वाटली. त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठीसारखी अंगठी बनवायची असल्याने आपण सोनाराकडे जाऊ असे त्याने सांगितले.

असे आहे फसवणूक प्रकरण
एका रिक्षात बसून दोघे सोनाराकडे जात असतांना त्या अनोळखी इसमाने दत्तू पाटील यांच्या हातातील अंगठीचे माप बरोबर बसते का म्हणून स्वतःच्या बोटात घालण्यासाठी मागितली. अंगठी बोटात टाकल्यावर बाजारात एके ठिकाणी रिक्षा थांबवून मला फळे घ्यायची आहेत, असे सांगून तो अनोळखी व्यक्ती उतरला. खूप वेळ झाल्यावर देखील ती व्यक्ती परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दत्तू पाटील यांना समजले. याप्रकरणी शुक्रवार, 19 एप्रिल रोजी अमळनेर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपीने केल्याची माहिती आहे. तपास हवालदार संतोष पवार करत आहेत.

 


कॉपी करू नका.