जळगावातील बेकायदा पाणी उत्पादन कारखान्यावर धाड : चार लाख दहा हजारांचा साठा जप्त

0

Raid on illegal water production factory in Jalgaon : stock of Rs 4 lakh ten thousand seized जळगाव : जळगावात बेकायदा सुरू असलेल्या पाणी उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीवरून धाड टाकली. यावेळी कारखान्यातील संबंधिताकडे कायदेशीर परवानगी नसल्याची बाब उघड झाली शिवाय कारखान्यात पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी सीलबंद पॅकींगद्वारे जळगाव जिल्ह्यासह गुजरातमध्ये त्याची विक्री सुरू असल्याचेही स्पष्ट झाले. चार लाख दहा हजारांचा जलसाठा कारखान्यातून जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई 
जळगावच्या एमआयडीसीतील गुरांच्या बाजारासमोर मे. देवांश सेल्स या नावाने सील बंद शुध्द पाण्याच्या बाटल्यांचा कारखाना सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व नाशिक विभागाचे सहआयुक्त सं.भा.नारगुडे यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार यांनी सहकार्‍यांसोबत शुक्रवारी या ठिकाणी धाड टाकली. अन्न परवान्याचे सादरीकरण कंपनी मालकाला करता आले नाही.

या ठिकाणी उत्पादित झालेल्या बाटल्यांची जळगाव शहर, जिल्हा व गुजरातमध्ये विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या बाटल्यांवरही गुजरात पॅकींग असा उल्लेख असून याची सखोल चौकशी केली जात आहे. आकाश बालाणी नावाच्या व्यक्तीचा हा कारखाना असल्याचे समजते.


कॉपी करू नका.