आठ महिन्यांचे बाळ झोळीतून लांबवले : साकेगावातील घटना

0

भुसावळ : झोळीतील आठ महिन्यांच्या बाळाला दोघा अज्ञातांनी पळवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील लेंडीपुरा भागात घडली. या घटनेने भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली. यप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी आहे नेमकी घटना
साकेगावात रजीता अर्जून भिल हे परिवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवार, 23 रोजी रात्री 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान घरात बांधलेल्या झोळीतील त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळाला दोन चोरट्यांनी दुचाकीवरून पळवून नेले. याप्रकरणी मुलाची आई रंजीता भील यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.


कॉपी करू नका.