पोलिसांचा खबरी असल्याचा संशय : लंगडा आंबा येथे तरुणाला दोघांची मारहाण

0

यावल : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील लंगडा आंबा येथे एका 23 वर्षीय तरुणावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करीत तेथीलच दोघांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केली व तरूणाच्या घराच्या दिशेने दगडफेक करून त्यांच्या घराचे नुकसान केले. तरुणासदेखील दुखापत झाली. या प्रकरणी यावल पोलिसात दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
सातपुड्याच्या कुशीत लंगडाआंबा या आदिवासी गावातील रहिवासी आमाशा गिला बारेला (23) याच्या घरी मयूर रातु बारेला आणि संगीता रातु बारेला हे दोघे आले. दारूच्या नशेत असलेल्या मयूर बारेला याने तरुणावर पोेलिसांचा खबरी आहेे, तुझ्यामुळे माझ्या वडिलांना पोलिसांनी पकडले असे सांगत शिवीगाळ करत, ठार मारण्याची धमकी दिली व घराच्या दिशेने दगडफेक करून त्यांच्या घराचे नुकसान केले. फिर्यादीच्या दिशेने वीट मारून फेकल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आमाशा बारेला यांच्या फिर्यादीवरून मयूर बारेला व संगीता बारेला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


कॉपी करू नका.