बोराळे येथे घराला आग : एक लाखाचे नुकसान

0

यावल : यावल तालुक्यातील बोराळे येथील मागासवर्गीस वस्तीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता घडली. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली मात्र तोवर घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत तब्बल एक लाखांचे नुकसान झाले व कुटुंब उघड्यावर आले.

आगीमुळे कुटूंब उघड्यावर
बोराळे, ता.यावल येथील मागासवर्गीय वस्तीत शरद दिनकर वानखेडे हे भाड्याच्या घरात राहतात. ते गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले. बंद घराला सकाळी 9 वाजलेच्या सुमारास आग लागली. हा प्रकार निदर्शनास येताच नागरीकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला व आग इतरत्र पसरू नये म्हणून दक्षता घेतली मात्र तोवर घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्न-धान्य, कपडे जळून खाक झाले. वानखेडे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचा पंचनामा तलाठी मधुराजे पाटील यांनी केला. बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले. आगीमुळे कुटुंब उघड्यावर आले असून नुकसानग्रस्ताला शासना कडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे.


कॉपी करू नका.