सावखेडासीमला गावठी हातभट्टीवर छापा : 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. गावालगत नाल्यात एक जण गावठी हातभट्टीची दारू गाळणी करीत होता. त्याच्याकडून 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सावखेडासीम, ता.यावल या गावात नाल्याच्या काठी युसूफ तडवी हा गावठी हातभट्टीची दारू गाळणी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारवाईने उडाली खळबळ
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार प्रमोद लाडवंजारी व यावल पोलिसांनी संयुक्तरीत्या त्या ठिकाणी कारवाई केली व तेथून गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व विविध साहित्य आणि गावठी दारू असा एकूण 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून युसूफ तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


कॉपी करू नका.