रावेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार

फैजपूर प्रांताधिकार्‍यांचे आदेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

0

Two innkeepers deported from Raver taluka रावेर : लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील रसलपूर येथील दोन सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. संबंधितांविरोधात चोरी, जबर दुखापत, प्राण्यांची कत्तल करणे, विनयभंग करणे आदी गुन्हे दाखल आहेत.

सहा महिन्यांसाठी संशयीत हद्दपार
रावेर पोलीस ठाणे हद्दीतील रसलपूर गावातील शेख हुसेन शेख हसन व शेख मुस्ताक उर्फ टिंग्या शेख ईसाक यांना आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवादरम्यान जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी देवयानी यादव यांनी काढला आहे. आदेशाची अंमलबजावणी करीत पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, समाधान ठाकुर, भारत पाटील यांनी केली.

यांनी सादर केला प्रस्ताव
संशयीतांना हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, राहुल परदेशी, समाधान ठाकुर, भारत पाटील यांनी तयार केला होता.


कॉपी करू नका.