रेल्वेचा पुन्हा ब्लॉक : दोन रेल्वेगाड्या रद्द : चार गाड्यांचे मार्ग बदलले

भुसावळ विभागातील प्रवाशांची होणार ऐन सुटीच्या हंगामात मोठी गैरसोय

0

Railway Blocked Again: Two Trains Cancelled : Routes of Four Trains Changed भुसावळ : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील काझीपेठ-विजयवाडा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे दोने रेल्वेगाड्या एप्रिल व मे महिन्यात रद्द करण्यात आल्या असून चार गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेने ऐनवेळी जारी केलेल्या ब्लॉकमुळे ऐन सुटीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. भुसावळ विभागातून धावणार्‍या या गाड्या असल्याने प्रवाशांना आता ऐनवेळी अन्य गाड्यांमधून प्रवास करावा लागणार आहे शिवाय पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी लागणार असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे.

दोनरेल्वे गाड्या रद्द
गाडी क्रमांक 07637 तिरुपती-साई नगर शिर्डी 28 एप्रिल. 5 व 19 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07638 साई नगर शिर्डी-तिरुपती एक्स्प्रेस 29 एप्रिल, 6 व 20 मे रोजी रद्द करण्यात आली आहे.

चार गाड्यांचे मार्ग बदलले
गाडी क्रमांक 20820 ओखा-पुरी एक्स्प्रेस 1 ते 15 मे पर्यंत वर्धा-नागपूर-रायपूर-तिटीलागढ-रायगड-विजियानगरम-खुर्दा रोडमार्गे वळवण्यात आली आहे. ही गाडी चंद्रपूर-बल्हारशाह-सिरपूर कागजनगर-मंचिरयाल-रामागुंडम-वारंगल-विजयवाडा-एलुरु-राजमुंद्री-समलकोट-अनाकपल्ले-विशाखापट्टणम स्थानकांवर जाणार नाही तसेच गाडी क्रमांक 20819 पुरी-ओखा एक्स्प्रेस 28 एप्रिल व 5 व 19 मे रोजी खुर्द रोड-विजियानगरम-रायगड-तिटीलागढ-रायपूर-नागपूर-वर्धा मार्गे वळवण्यात येणार आहे.

ही गाडी विशाखापट्टणम-अनकपल्ले-समलकोट-राजमुंद्री-एलुरु-विजयवाडा-वारंगल-रामागुंडम-मंचिरयाल-सिरपूरकागजनगर-बल्हारशाह-चंद्रपूर स्थानकांवर जाणार नाही. गाडी क्रमांक 20803 विशाखापट्टणम-गांधीधाम एक्सप्रेस 2 ते 16 मे दरम्यान विशाखापट्टणम-विजियानगरम-रायगड-तिटीलागड-रायपूर-नागपूर-वर्धा मार्गे वळवण्यात येईल शिवाय ही गाडी समलकोट-राजमुंद्री-एलुरु-विजयवाडा-वारंगल-रामागुंडम-मंचिरयाल-सिरपूरकागजनगर-बल्हारशाह-चंद्रपूर स्टेशनवर जाणार नाही. गाडी क्रमांक 20804 गांधीधाम-विशाखापट्टणम एक्सप्रेस 28 एप्रिल, 5 व 19 मे रोजी वर्धा-नागपूर-रायपूर-तिटीलागढ-रायगढ-विशाखापट्टणम-विशाखापट्टणम मार्गे वळवली जाईल. ही ट्रेन चंद्रपूर-बल्हारशाह-सिरपूर कागजनगर-मंचिरयाल-रामागुंडम-वारंगल-विजयवाडा-एलुरु-राजमुंद्री-समलकोट स्थानकांवर जाणार नाही. विकासकामांसाठी व गैरसोयीसाठी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.