भुसावळात अनोळखीचा मृतदेह आढळला : ओळख पटविण्याचे आवाहन


भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर एका अनोळखी प्रवाशाचा मृतदेह आढळला. सुमारे 75 वयोगटातील अनोळखी व्यक्तीबाबत अद्याप ओळख पटलेली नाही.

लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार सुभाष पाटील पुढील तपास करीत आहे. अनोळखी व्यक्तीबद्दल कुणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !