पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये भुसावळातील वयोवृद्धेचा मृत्यू

0

Death of an elderly person from Bhusawal in Pathankot Express भुसावळ : दादर-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या भुसावळातील लिलाबाई तिरसिंग पाटील (75, रा.प्रभाकर हॉलमागे, भुसावळ) या वयोवृद्धेचा गाडीतच हदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी भुसावळ स्टेशन येण्यापूर्वीच घडली.

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
लिलाबाई पाटील या त्याचा मुलगा वसंत पाटील, सूनबाई यांच्या सोबत मुबई येथून पठाणकोट एक्स्प्रेसच्या ए-1 या डब्यातील 51 नंबरच्या सीटवर बसून भुसावळला येत होत्या. भुसावळ आऊटरला गाडी आली असतांनाच त्या बाथरूमला जाऊन येते असे सांगून सीटवरून उठल्या व शौचालयात गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्या कोसळल्या. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड केली. त्यांचा मुलगा व सूनबाई यांनी तत्काळ त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत गाडी स्थानकावर आल्यावर त्यांना गाडीतून खाली उतरून रेल्वे हॉस्पीटलला नेले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. लिलाबाई यांच्या पश्चात तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.


कॉपी करू नका.