संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीला आग : 15 लाखांचे नुकसान

0

Fire at Sant Muktai Cooperative Yarn Mill : Loss of 15 lakhs मुक्ताईनगर : शहराजवळील मानेगावजवळ संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीला रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने खळबळ उडाली. वेळीच अग्निशमन दलाने धाव घेतल्याने मोठी अप्रिय घटना टळली. या आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे व्यवस्थापक हेमराज खुशाल पाटील यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

शॉर्ट सर्किटने लागली आग
रविवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आदिशक्ती संत मुक्ताई सुतगिरणी, चांगदेव शिवार, ता.मुक्ताईनगर या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सूतगिरणीतील साहित्य व उपकरणे जळून खाक झाली. यामुळे मुक्ताई सूतगिरणीतील मशिनरीचे केबल वायरिंग, एअर पाईप, मशिनरीचे स्पेअर पार्ट, कॉटन वेस्ट ऑटो कोनर व रिंग फ्रेम, आर.ए.ट्रेचेस चे जळून नुकसान होऊन अंदाजे एकूण 15 लाखांचे नुकसान झाले. मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.


कॉपी करू नका.