गाडर्‍यात गावठी हातभट्टी दारू विक्री करताना एकाला पकडले

0

A villager was caught selling liquor in a car यावल : यावल तालुक्यातील गाडर्‍या गावातील शिरवेल जाणार्‍या रस्त्यावर एक जण गावठी दारू विक्री करीत असताना पोलिसांनी कारवाई करीत त्याच्याकडून गावठी दारू जप्त करीत गुन्हा दाखल केला.

गाडर्‍या, ता.यावल या गावातून शिरवेल जाणार्‍या रस्त्यावर थावर्‍या दलसिंग बारेला हा एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये 30 लीटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशातून आपल्याजवळ बाळगत असताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन हजार 100 रुपयांची गावठी दारू जप्त केली व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पोलीस नाईक वसीम तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युनूस तडवी करीत आहे.

 


कॉपी करू नका.