भुसावळात गायींची निर्दयतेने वाहतूक : पंजाबच्या चालकांसह तिघांविरोधात गुन्हा

0

Cruel transportation of cows in Bhusawal : Case against three including drivers from Punjab भुसावळ : कत्तलीच्या उद्देशाने गायींची वाहतूक करणारे दोन ट्रक सतर्क गो प्रेमींनी भुसावळात अडवत 25 गायींना जीवदान दिल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील यावल नाक्यावर घडली होती. याप्रकरणी रात्री उशिरा पंजाब राज्यातील दोघा चालकासह क्लीनरविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुदमरून तीन जनावरांचा मृत्यू
पंजाब राज्यातून गायींची अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने दोन ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती यावल तालुक्यातील गो प्रेमींना मिळाल्यानंतर त्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकांनी त्यांना हुलकावणी देत ट्रक सुसाट वेगाने भुसावळच्या दिशेने दामटला मात्र ही बाब भुसावळातील गो प्रेमींना कळवण्यात आल्यानंतर यावल नाक्यावर दोन ट्रक (पी.बी.35 क्यू.9230 व पी.बी.02 डी.डब्ल्यू.7849) गो प्रेमींच्या उपस्थितीत अडवण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या उपस्थितीत ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यात अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेने गायींची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. ट्रकमध्ये गुरांसाठी कुठलीही चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याने दोन्ही ट्रक अकलूद येथील आसाराम बापूजी आश्रमात नेण्यात आल्या व तेथे चारा-पाण्याची तसेच उपचाराची व्यवस्था करण्यात आली. दाटीवाटीने केलेल्या वाहतुकीमुळे दोन गायींसह एका वासराचा गुदमरून मृत्यू झाल्याने मृत जनावरांची गोप्रेमींनी विल्हेवाट लावली.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
शुभम मोहन रूमकर (27, साकरी, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून कलबोरसिंग अवतार सिंग (40, सकोपुरा, ता.जि.अमृतसर, पंजाब) अमनदीपसिंग गौरबच्चनसिंग (38, सटयाली, ता.जि.गुरूदासपूर, पंजाब) व क्लीनर सुखविंदरसिंग मोतासिंग (40, वरीयन, ता.गुरूदासपूर, पंजाब) यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहेत.


कॉपी करू नका.