बोदवड शहरात चाकूच्या धाक दाखवत तरुणाला लूटले

0

A young man was robbed at knife point in Bodwad city बोदवड : शहरातील धनराजशेठ यांच्या दारू दुकानाजवळ चाकूचा धाक दाखवत एकाकडील 15 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लूटण्यात आला. याप्रकरणी बोदवड पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
राजू उत्तम बडगुजर (34, प्रभाग क्रमांक दहा, जैन मंदिराजवळ, बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, बुधवार, 29 रोजी रात्री नऊ वाजता संशयीत शेड्या उर्फ किसन सोनवणे, सुध्या पवार, वांडर माळी (भिलवाडा, बोदवड) यांनी शहरातील धनराज शेठ यांच्या दारूच्या दुकानाजवळ हातातील चाकूद्वारे धमकावत दोन्ही हात पकडून ठेवत खिशातील पैसे व मोबाईल मिळून एकूण 15 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हिसकावला. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.


कॉपी करू नका.