भुसावळात राधाकृष्ण हॉटेलमधील स्टोर रूमला आग : पाच लाखांचे नुकसान

0

Fire in the store room of Radhakrishna Hotel in Bhusawal : loss of five lakhs भुसावळ : भुसावळ शहरातील राधाकृष्ण हॉटेल व लॉजींगमधील स्टोर रूमला अचानक आग लागली. या आगीत पाच लाख 20 हजार 500 रुपये किंमतीचे टेन्ट हाऊस व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. आगीची घटना शुक्रवार, 3 मे रोजी पहाटे चार वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

आगीचे कारण अस्पष्ट
भुसावळातील उद्योजक बद्रीनारायण मोहनलाल अग्रवाल (58, रा.राधाकृष्ण हॉटेलजवळ, भुसावळ) यांचे राष्ट्रीय महामार्गावर राधाकृष्ण हॉटेल व लॉजिंग हॉटेल आहे. शुक्रवार, 3 मे रोजी पहाटे चार वाजता अचानकपणे त्यांच्या हॉटेलमधील स्टोर रूमला आग लागली. या आगीत स्टोअर रूमधील बेडशीट, रुमाल, पिलो कव्हर, आर्टिफिशियल फुले, डेकोरेशनचे कापड, एलईडी लाईट, टेन्ट हाऊसचे साहित्य व डेकोरेशनचे साहित्य असा एकूण पाच लाख 20 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली याची कोणतीही समोर आलेली नाही. न भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणण्यात आली. या संदर्भात सायंकाळी पाच वाजता बद्रीनारायण अग्रवाल यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुमन राठोड ह्या करीत आहे.


कॉपी करू नका.