किनगावात किराणा दुकानातून अडीच लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त, एकाविरूध्द गुन्हा दाखल

0

Gutkha worth two and a half lakhs was seized from a grocery store in Kingaon, a case was registered against one यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील किराणा दुकानातून राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 11 वाजता केली. दोन लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
किनगाव, ता.यावल येथील मुख्य चौकाजवळ श्रीराम मंदिर परिसरात अनिल किरणा दुकान आहे. या दुकानात अवैधरित्या सुगंधित पान मसाला आणि गुटखा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर येथील उपविभागीय पोलीस आधिकारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यापथकाने शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 11 वाजता दुकानात छापा टाकला. यात सुगंधित पानमसाला आणि गुटखा असा सुमारे दोन लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल दुकानात आढळल्योन तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक अल्ताफ अली हसन अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात किराणा दुकानदार जगन्नाथ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


कॉपी करू नका.