भुसावळातील गुटखा किंगवर कारवाई : 70 हजारांचा गुटखा जप्त

0

Action taken against gutkha king in Bhusawal : Gutkha worth 70 thousand seized भुसावळ : भुसावळ शहरातील जामनेर रोडवर शनिवारी संध्याकाळी बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सुमारे 70 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि दीड लाख रुपये किंमतीची अ‍ॅपे रीक्षा मिळून सुमारे दोन लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात बिनदिक्कतपणे बर्‍हाणपूर भागातून गुटख्याची वाहतूक होत असून अन्न औषध प्रशासन व पोलिसांकडून अपवादात्मकरीत्या कारवाई होत असल्याचे चित्र आहे. गुटखा माफियांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शहरात बिनदिक्कतपणे पानटपरी, किराणा दुकानांवर सर्रासपणे गुटखा उपलब्ध होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवावे, अशी माफक अपेक्षा सुज्ञ जनतेची आहे.

दोघा संशयीतांविरोधात गुन्हा
बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस कर्मचारी भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी कैलास अग्रवाल तसेच रिक्षा चालक शकील अहमद यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.