प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्रावाने रावेर तालुक्यातील विवाहितेचा मृत्यू

0

Death of a married woman in Raver taluka due to excessive bleeding during childbirth रावेर  : प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे केर्‍हाळे बु.॥ येथील आदिवासी महिलेचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. केर्‍हाळे बु.॥, ता.रावेर येथील आदिवासी महिला संगीता अनिल भील (27) ही रविवारी सकाळी साडेपाच वाजता स्वतःच्या घरी सुखरूप प्रसुत झाली. कन्येला तिने जन्म दिला मात्र प्रसुतीनंतर अतीरक्तस्त्राव होत असल्यामुळे तिच्या पतीने तिला रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता तिला त्यांनी मृत घोषित केले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत अनिल बाळू भील याने रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नितीन डांबरे करीत आहेत.

 


कॉपी करू नका.