खासदार रक्षाताई खडसे यांचा मुक्ताईनगर तालुक्यात प्रचाराचा झंझावात

नरेंद्रजी मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदानाचे आवाहन

0

मुक्ताईनगर : नरेंद्रजी मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी प्रचारादरम्यान केले. रावेर लोकसभा महायुती व भाजपाचया उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वडोदा, पारंबी, कुर्‍हा, चारठाणा, निमखेडी बु.॥ गावात सोमवारी प्रचार दौरा केला.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वडोदा, पारंबी, कुर्‍हा, चारठाणा, निमखेडी बु.॥ गावात प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.


कॉपी करू नका.