वंचित आघाडीचे संजय ब्राह्मणेच खासदार होणार ! : कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास !

बोदवडसह यावल तालुक्यात वंचित आघाडीचा प्रचाराचा झंझावात

0

Sanjay Brahmin of Vanchit Aghadi will become MP ! : Workers expressed their faith! भुसावळ : बोदवडसह यावल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे जोरदार प्रचार दौरा सुरू करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत आपली ताकद लावली आहे. वंचित घटकातून उमेदवारी मिळालेल्या संजय ब्राह्मणे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. ब्राह्मणे हे उच्चशिक्षीत उमेदवार असून यंदा लोकसभेत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमधून प्रचारादरम्यान व्यक्त होत आहे तर मतदारांकडूनही ब्राह्मणे यांचे स्वागत केले जात आहे.

बोदवडसह यावल तालुक्यात जोरदार प्रचार
सोमवारी यावल तालुक्यातील दहिगावसह सावखेडा परिसरात रावेर लोकसभेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, युवा जिल्हा संघटक, भूषण साळुंखे, सोशल मिडियाचे सचिन बाऱ्हे, महिला आघाडी यावल तालुकाध्यक्ष, किनगाव शहर अध्यक्ष, महिला तालुका संघटक लताबाई बाविस्कर, तालुका संघटक भानुदास महाजन, तालुका उपाध्यक्ष संतोष तायडे, जनार्दन तायडे,आकाश तायडे, कार्यकर्ता विजय तायडे, आदिवासी नेते बिलालसिंग पावरा आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.