खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यात मतदारांशी साधला संवाद

तिसर्‍यांदा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदानाचे आवाहन

0

MP Rakshatai Khadse interacted with voters in Muktainagar Taluka मुक्ताईनगर : रावेर लोकसभा महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे चांगदेव व हरताळा गावात सोमवारी दिवसभरात प्रचार दौरा करीत भाजपाला मतदानाचे आवाहन केले. गेल्या दहा वर्षात केलेल्या विविधांगी विकासकामांच्या जोरावर मतदारांनी पुन्हा भाजपाला कौल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव व हरताळा येथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह भेट दिली. मुख्य रस्त्याने महाविजय संकल्प रॅली काढून, मतदारांशी संवाद साधला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.


कॉपी करू नका.