यावल शहरात 30 हजारांचा विमल गुटखा जप्त

0

Vimal Gutkha worth 30 thousand seized in Yaval city यावल : शहरातील ख्वाजा नगरातील रहिवासी शेख फारूक शेख युसूफ हा मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या विमल गुटख्यासह सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने छापा मारला असता 29 हजार 588 रुपयांच्या विमल गुटख्यासह सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केली. शेख फारूक याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना येथील ख्वाजा नगरातील रहिवासी फारुख शेख युनूस हा स्वतःच्या कब्जात मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल गुटखा व सुगंधित तंबाखू स्वत:च्या कब्जात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हेड कॉन्स्टेबल उमेश सानप, वसीम असलम तडवी यांनी ख्वाजा नगरातील शे. फारूख शे. युसूफ यांच्याकडे छापा टाक सुगंधी तंबाखूसह विमल गुटख्याची 20 रुपये किंमतीची 150 पाकिटे असा 29 हजार 588 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाईक वसीम असलम तडवी यांच्या फिर्यादीवरून शेख फारुख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार मोरे करत आहेत.


कॉपी करू नका.