तक्रार मागे न घेतल्याने भुसावळात एकावर चाकू हल्ला
भुसावळ- पोलिस ठाण्यात दाखल तक्रार मागे घ्यावी या कारणावरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शहरातील मुस्लीम कॉलनीत एकावर चाकूने हल्ला केल्याची घटना 18 रोजी पहाटे दोन वाजता घडली. कदीर शहा नसीर शहा (पाण्याच्या टाकीजवळ, मुस्लीम कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी गोलू रशीद सैय्यद व सादीक भाजी यांनी 18 रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवर येऊन आरोपींविरुद्ध फिर्यादीच्या पत्नीने दाखल केलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून धमकावत डाव्या हातावर तसेच डोक्यावर चाकू मारून दुखापत केली. कुटुंबियांनी ही घटना कळताच त्यांनी धाव घेतल्यानंतर आरोपींनी पळ काढला. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.