कासव्याला तरुणाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


यावल : यावल तालुक्यातील कासवा गावात वेल्डिंग वर्कशॉपच्या दुकानावर बसलेल्या 28 वर्षीय तरुणाला माझ्याकडे काय बघतो ? असे सांगत एकाने वाद घातला व चौघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करीत डोक्यात वार करून दुखापत केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.कासवा, ता.यावल

किरकोळ वादातून मारहाण
या गावात रुपेश हरचंद सपकाळे (28) हा तरुण वेल्डिंग वर्कशॉप दुकानावर बसला असताना तेथे पवन संतोष सपकाळे याने येऊन माझ्याकडे काय बघतो ? असे सांगत वाद घातला. पवन सपकाळेसह प्रशांत कैलास रायसिंगे, जितेंद्र जनार्धन सपकाळे व आनंद पुना सपकाळे (सर्व रा.कासवा) या चौघांनी त्याला शिविगाळ करून मारहाण केली व स्टील रोडने त्याच्या डोक्यावर मारून दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !