कठोरा येथे दाम्पत्याला तिघांची मारहाण


यावल : यावल तालुक्यातील कठोरा या गावात एका 36 वर्षीय महिलेच्या घरात दारूच्या नशेत एक तरूण आला व त्याने मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचे होते, तुम्ही तिचा साखरपुडा का केला ? असे सांगत वाद घातला व त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला व या तरुणाने अशा तिघांनी दाम्पत्याला शिविगाळ करून मारहाण केली तसेच लाकडी काठीने मारून दुखापत केली. ही घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
कठोरा, ता.यावल गावात 36 वर्षीय महिला आपल्या पतीसह राहते. त्यांच्या घरात रविवारी रात्री दहा वाजता दारूच्या नशेत अंकुश सुनील कोळी हा गेला आणि त्याने सांगितले की, तुमच्या मुली सोबत लग्न करणार होतो. तुम्ही तिचा साखरपुडा का केला असे सांगत त्याने वाद घातला व त्याच्यासोबत असलेल्या शांताबाई जानकीराम कोळी व सुनीता सुनील कोळी व सदर तरूण या तिघांनी महिला व तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच लाकडी काठीने मारून दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !