भुसावळकरांना दिलासा : हतनूर धरणातून आवर्तन सुटले


Relief for Bhusawalkars: The circulation has been released from Hatnur Dam भुसावळ  : भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पालिकेच्या बंधार्‍यात अल्यल्प जलसाठा असल्याने पालिकेने हतनूर प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार सोमवारी दुपारी एक हजार डे क्युसेसने आवर्तन सोडण्यात आले. भुसावळ पालिकेच्या बंधार्‍यात हे पाणी शुक्रवार, 24 मेच्या सकाळपर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत पालिकेला बंधार्‍यात शिल्लक असलेल्या जलसाठ्याचा वापर करावा लागेल.

शुक्रवारपर्यंत बंधार्‍यात येणार पाणी
भुसावळ शहराला तसेच रेल्वेच्या वसाहतीला तापी पात्रात बंधार्‍यात जलसाठा केला जातो मात्र गेल्या आठवड्यापासून उच्चांकी तापमानामुळे बंधार्‍यातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहर आणि रेल्वेला पाणीपुरवठा करणार्‍या बंधार्‍यात अत्यल्प जलसाठा आहे. यामुळे पालिका प्रशासनाने हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी केली होती. यानुसार सोमवारी दुपारी 12 वाजता धरणातून एक हजार डे क्युसेस वेगाने विसर्ग करण्यात आला. हे आवर्तन पालिकेच्या बंधार्‍यात शुक्रवारी सकाळपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.



40 ऐवजी 32 दिवसांनी आवर्तन
हतनूर धरणातून शहराला 40 दिवसांनी आवर्तन दिले जाते. यंदा मात्र ते 32 दिवसांनी देण्यात आले. गत महिन्यात 18 एप्रिलला आवर्तन देण्यात आले होते. यानुसार ते यंदा मे अखेरीस दिले जाणार होते, मात्र पालिका प्रशासनाकडून मागणी आल्याने यंदा वेळेपूर्वी आवर्तन दिल्याची माहिती हतनूरच्या सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !