डोंगरकठोरा शिवारात महिलेवर रानडुकरांचा हल्ला : महिला गंभीर जखमी


यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारामध्ये शेतात काम करत असताना एका 50 वर्षीय महिलेवर रानडुकराने हल्ला चढवला. महिलेच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली आणि चेहर्‍यावर देखील रान डुकराने चावा घेतला आहे. ही घटना बुधवार, 22 मे रोजी दुपारी घडली. महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

अचानक चढवला हल्ला
डोंगरकठोर, ता.यावल या शेत-शिवारात रेखाबाई नीळकंठ चौधरी (50, डोंगरकठोरा) ही महिला शेतात काम करत असतांना अचानक या महिलेवर रानडुकराने हल्ला चढवला आणि या हल्ल्यात महिलेचा उजव्या पायाला जबर दुखापत केली. महिलेच्या चेहर्‍यावरदेखील रानडुकराने चावा घेतला. महिलांनी आरडा-ओरड केल्याने शेतमजुरांनी धाव घेतली आणि महिलेला रानडुकराच्या तावडीतून सोडवले व तेथून तातळीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, डॉ.सौरव भूताने, अधिपरिचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, बापू महाजन आदींनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या पायाला जबर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 


कॉपी करू नका.