संच मान्यतेच्या नावाखाली मुख्याध्यापकही अतिरिक्त ठरविण्याचा शिक्षण विभागाचा घाट

भुसावळातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्र. ह. दलाल यांचा आरोप


The education department’s ghat to appoint additional principals in the name of batch approval भुसावळ : आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीअतिरिक्त ठरत असल्याचे अनुभवास येत होते मात्र आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त झाल्यास आश्चर्य वाटून घेवू नका, कारण नुकताच 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचे सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्याच शासन आदेशात मुख्याध्यापकांचे पद अनुज्ञेय होण्यासाठी सुद्धा निकष दिले असल्याचे शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी पत्रकान्वये कळवले आहे.

तरा मुख्याध्यापक ठरतील अतिरीक्त
येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून 2024-2025 पासून शासन निर्णयानुसार पद निश्चिती होईल. त्यातील तरतुदी नुसार आता माध्यमिक शाळेतील सर्व वर्गांची मिळून विद्यार्थी संख्या जर 150 पेक्षा कमी झाली तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरीक्त ठरेल. एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही. या शासन निर्णयात असेही म्हटले आहे की, यापूर्वीचे या विषयाशी संबंधित म्हणजे शाळांतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद मान्यता ठरविणारे सर्व म्हणजे 28 ऑगस्ट 2015, 8 जानेवारी 2016, 2 जुलै 2016 व दि.01जानेवारी 2018 हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित करण्यात आले आहेत. अतिरिक्त ठरविण्यासाठी आता 2024/2025 पासून हाच म्हणजे 15 मार्च 2024 चाच शासन निर्णय ग्राह्य धरण्यात येईल.



मुख्याध्यापकांचे समायोजन कसे करणार?
आदेशानुसार अतिरिक्त मुख्याध्यापक त्यांच्या संस्थेच्या इतर शाळा असतील व तेथे मुख्याध्यापक पद रिक्त असेल तर त्याच संस्थेच्या शाळेत समायोजन होईल. जागा रिक्त नसेल तर जिल्ह्यात ज्या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असेल त्या शाळेत समायोजन होईल आणि तेथेही जागा रिक्त नसेल तर त्या अतिरिक्त मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणून समायोजित केले जाईल. अर्थात ही पदावनती होणार आहे.

शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू नये
शिक्षक म्हणून कार्यरत राहिला तरी त्याला पूर्वी मुख्याध्यापक म्हणून जे वेतन मिळत होते तेच कायम राहिल मात्र शाळा मुख्याध्यापक विना कधी चालवायची ही एक तारेवरची कसरतच ठरेल यात शंकाच नाही. पैसे वाचविण्यासाठी शासनाने शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू नये त्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !