दहिगाव गावातील इदगाह मैदानासमोरील शेतातून पशूधनाची चोरी


Theft of livestock from the farm in front of Idgah Maidan in Dahigaon village यावल : यावल तालुक्यातील दहिगाव गावातील ईदगाह समोरील शेतात गोठ्यात बांधलेला बैल चोरट्यांनी लांबवला. 30 हजार रुपये किंमतीचा हा बैल होता. चोरीची घटना मंगळवार, 21 मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरीच्या घटनांनी शेतकरी संतप्त
दहिगाव येथील ईदगाह मैदानासमोर शेत गट क्रमांक 505 आहे. यामध्ये प्रेमचंद शांतीलाल जैन यांनी गुराचा गोठा बांधला आसून तेथून तीस हजार रुपये किंमतीचा एक बैल अज्ञात चोरट्याने दोर कापून चोरी केला. हा प्रकार शनिवार, 25 मे रोजी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी प्रेमचंद जैन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अद्यात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !