भुसावळकरांना वर्षभरातून अवघा 52 दिवस पाणीपुरवठा

वर्षभराची मात्र पाणीपट्टी आकारणी : बंधारा तुडूंब मात्र पाण्यासाठी भटकंती


Water supply to Bhusawalkars only 52 days in a year भुसावळ : शहराला मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. तापी बंधार्‍यात मुलबक जलसाठा शिल्लक असताना तसेच सध्या कोणतेही तांत्रिक प्रश्न नसताना शहरात 10 ते 12 दिवसाआंड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागांमध्ये दोन तास तर काही भागांमध्ये सलग 24 ते 36 तास पाणीपुरवठा केला जातो. समान वितरण नसल्याने करदात्यांवर अन्याय होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी 625 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. दररोज पाणी मिळणे अपेक्षीत असताना सध्या आठवड्याआड म्हणजे वर्षभरात केवळ 52 दिवस पाणीपुरवठा होत आहे.

तापी उशाला मात्र कोरड घशाला
भुसावळ शहरात पाणीपुरवठ्याचे भविष्यकालीन नियोजन न झाल्याने सध्या तापी उशाला असतानाही भुसावळकरांना आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. पालिकेकडून वार्षिक 625 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. वर्षभरात दररोज पाणीपुरवठयासाठी आकारणी होत असताना शहरात मात्र आठवड्यातून एकवेळा अर्थात वर्षांत 52 दिवस पाणीपुरवठा होतो. शहरात पालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या विस्तारीत भागात पालिकेने पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा दिला आहे. या भागात आठ दिवसांआड पाणी मिळते. मात्र हद्दीबाहेर असल्याने या नागरिकांना दुप्पट अर्थात वार्षिक 1250 रुपये पाणीपट्टी द्यावी लागत आहे. यानंतरही पाणी मिळत नसल्याचे चित्र कायम आहे.



कालबाह्य योजना झाली जीर्ण
भुसावळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1958 मध्ये एमजीपीने पाणीपुरवठा योजना उभारली. अत्यंत शुध्द, तिसर्‍या माळ्यावर व मिटरव्दारे पाणीपुरवठा होणारी ही यंत्रणा आता कोमात गेली आहे. पालिकेने या योजनेवर 1982 मध्ये ताबा मिळवला, तेव्हापासूनच या योजनेचे दिवाळे निघाले.

पाईप लाईनला वारंवार गळती
शहरात पाणीपुरवठ्यासाठी केवळ तीन जलकुंभ आहेत. ते भरण्यासाठीही अधिक वेळ लागतो. जलवाहिन्या 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या असल्याने वारंवार गळती लागत असल्यानेही पाणीपुरवठा यंत्रणेतून काही अंशी प्रक्रिया झालेले पाणी पुन्हा अशुध्द होते. शहरात पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !