भुसावळातील तापी पुलावर कारच्या धडकेने पेपर मिल कर्मचारी जखमी
A paper mill employee injured after a car collided with Tapi bridge in Bhusawal भुसावळ : भरधाव कारने धडक दिल्याने दुसखेडा पेपर मिलचा कर्मचारी जखमी झाला व दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात भुसावळातील तापी पुलावर शुक्रवार, 24 मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शहर पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखलल करण्यात आला.
कार चालकाविरोधात गुन्हा
ओम उर्फ आकाश नंदकुमार पाटील (32, दुसखेडा पेपर मिल, ता.यावल) या तरुणाच्या तक्रारीनुसार, शुक्रवार, 24 मे रोजी तापी पुलावरून दुचाकीने जात असताना भरधाव कार (एम.एच.04 ई.एच.4708) वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भराधाव वेगाने कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने हाताच्या पंजाला व दोन्ही पायांच्या गुडघ्याला दुखापत झाली तसेच वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. तपास हवालदार पराग सोनवणे करीत आहेत.
