बांधावर पाला-पाचोळा पेटवताच एक लाखांच्या ठिबकसह पीव्हीसी पाईपचे नुकसान : येवतीच्या तिघांविरोधात गुन्हा


बोदवड : शेतावरील पाला-पाचोळ्याला आग लावल्यानंतर त्याची धग शेजारील शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचल्यानंतर पीव्हीसी पाईप, ठिबक नळ्या व मोटारीच्या केबलला बसल्याने सुमारे एक लाखांचे नुकसान झाले. ही घटना येवती शिवारात मंगळवार, 7 मे रोजी दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी येवतीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधाल गुन्हा दाखल
धनराज देविदास गिरी (51, बेटावद खुर्द, ता.जामनेर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत प्रवीण अशोक जस्वाल, प्रताप अशोक जस्वाल, अशोक पन्नालाल जस्वाल (सर्व रा.येवती, ता.बोदवड) यांनी येवती शिवारातील त्यांच्या शेताच्या बांधावर पाला-पाचोळ्याला मंगळवार, 7 मे रोजी दुपारी एक वाजता आग लावली व आगीची धग शेजारील शेतकर्‍यांच्या शेतातही पसरल्याने सुमारे एक लाखांचे शेती साहित्य खाक झाले. तीन्ही संशयीतांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !