डोणगाव येथे किरकोळ कारणावरून 38 वर्षीय महिला व तिच्या पतीला मारहाण


यावल : यावल तालुक्यातील डोणगाव गावात 38 वर्षीय महिलेसह पतीला किरकोळ कारणावरून गावातील चौघांनी वाद घालत शिविगाळ करीत मारहाण केली व महिलेचा विनयभंग केला. ही घटना सोमवार, 27 मे रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

डोणगाव येथे 38 वर्षीय महिला तिच्या पतीसह राहते. त्यांच्यासोबत सुनील गोविंदा पाटील, राकेश उर्फ बबलू सुनील पाटील, कोमल राकेश पाटील व सुरेखा सुनील पाटील या चौघांनी वाद घातला आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच 38 वर्षीय महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !