न्हावीतील बिअर बार समोरून दुचाकी लांबवली


यावल : यावल तालुक्यातील न्हावी या गावातील बिअर बार समोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरी केली. ही घटना शनिवार, 25 मे रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीच्या चोरीमुळे उडाली खळबळ
न्हावी, ता.यावल या गावात बिअर बारसमोर सचिन भास्कर साळुंखे यांनी आपली मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 एन.9839) ही लावली होती. बिअर बारच्या बाहेर लावलेली ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देविदास सूरदास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !