पिळोदा येथे किरकोळ कारणावरून 32 वर्षीय तरुणाला मारहाण


यावल : यावल तालुक्यातील पिळोदे खुर्द गावात शेत गट क्रमांक 55 मध्ये 32 वर्षीय तरुण उभा असताना किरकोळ कारणावरून दोघांनी जाऊन त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादातून मारहाण
पिळोदे खुर्द, ता.यावल या गावात शेत गट क्रमांक 55 मध्ये निखील मन्नालाल पाटील (32) हा तरुण उभा असताना किरकोळ कारणावरून त्याच्याशी जितेंद्र उर्फ सोनू आधार सोनवणे व अविनाश उर्फ गोलू आधार सोनवणे या दोन्ही भावांनी वाद घातला आणि त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलिसांनी निखिल पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !