यावल शहरात एअरटेल कंपनीच्या वायरचे नुकसान


यावल : शहरातील चोपडा रस्त्यावर हडकाई खडकाई नदीच्या पुलाखाली असलेली एअरटेल कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल अज्ञात व्यक्तीने कापून नुकसान केले. ही घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेला उघडकीस आली. यामुळे काही काळ मोबाईल सेवा व इंटरनेट सेवा ही विस्कळीत झाली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चोपडा रस्त्यावर हडकाई व खडकाई नदीच्या पुलाखाली एअरटेल कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल आहे. या केबलच्या माध्यमातून यावल शहरात एअरटेल मोबाईल सेवा आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते मात्र मंगळवारी सकाळी दहा वाजता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने केबल कापली त्यामुळे यावल शहरातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा विस्कळीत झाली. हा प्रकार निदर्शनास येताच कंपनीचे अभियंता त्या ठिकाणी आले व त्यांनी तत्काळ जोडणी केली व मोबाईल व इंटरनेट सेवा सुरळीत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अभियंता गणेश डिगंबर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !