मोठा वाघोदा येथे पाईप लाईनची दुरुस्ती : पाण्याचे शुद्धीकरण
मोठे वाघोदा : गावात नुकतीच कॉलरा आजाराची लागण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खळबळडून जागी झाली होती. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील सर्व संबंधित विभाग प्रमुख व सर्व यंत्रणेने गुरुवारी वाघोदा येथे संपूर्ण पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करून घेतले. पाणीपुरवठा करणार्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली तर आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन रुग्णांबाबत चौकशी करण्यात आली.
ग्रामस्थांना स्वच्छतेचे केले आवाहन
गावातील रुग्णांना ओआरएसबद्दल माहिती देण्यात आली तसेच हात धुणे, ओआरएस तयार करण्याबाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले शिवाय परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून एकही नवीन रुग्ण या गावांमध्ये आढळून आला नाही तसेच सर्व आरोग्य संस्थांमध्ये औषधी साठा मुबलक उपलब्ध करण्यात आल्याचे यंत्रणेने कळवले आहे.

