रावेरात बंद घरात चोरी : 66 हजारांचा ऐवज लंपास
Theft in a closed house in Raver : 66 thousand in compensation रावेर : शहरातील तडवी कॉलनीत घराचा कडी-कोंडा तोडून सोन्याचे दागिने व चोरट्यांनी रोख रकमेसह 66 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
वाढत्या चोर्यांनी नागरिक भयभीत
तडवी कॉलनीतील मुनाफ गंभीर तडवी हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरटयांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातून अंगठी, सोन्याचे मणी व पाच हजार रुपये रोकड असा 66 हजार 408 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत मुनाफ तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉस्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.
