भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले


भुसावळ : शहरातील कस्तुरी नगर भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार 29 मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीच्या 20 वर्षीय भावाने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 14 वर्ष 10 महिने वयाच्या अल्पवयीन बहिणीला अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. सर्वत्र शोध घेवूनही बहिणीचा तपास न लागल्याने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !