भुसावळात मिळकतीच्या ताब्यावरून तोडफोड करीत ठार मारण्याची धमकी : चौकडी अटकेत

म्युन्सीपल पार्कमधील घटना : वकीलासह नऊ संशयीतांविरोधात शहर पोलिसात गुन्हा


भुसावळ : शहरातील म्युन्सीपल पार्क भागातील सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनची मिळकत ताब्यात घेण्याच्या वादातून हातात लाठ्या-काठ्या घेवून संशयीतांनी इमारत खाली करण्याची मागणी करीत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तोडफोड केली तसेच कार्यालयाचे कुलूप तोडून असोसिएशनच्या संचालकास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वकीलासह नऊ संशयीतांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला चार संशयीतांना अटक करण्यात आली.

अर्जाच्या चौकशीअंती गुन्हा
संजय सुरेशचंद्र सुराणा (29, गरूड प्लॉट, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीतांनी गुरुवार, 6 मे 2024 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हातात लाठ्या-काठ्या घेवून तक्रारदारच्या सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनच्या मिळकतीचे कुलूप तोडत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची व बोर्डाची तोडफोड केली, तुम्ही या इमारतीचे भाडेकरू असल्याने ईमारत खाली करून सामान काढून घ्या, अशी धमकी देत शिविगाळ केली. यावेळी ईमारतीवर जबरदस्तीने कब्जा करीत तक्रारदाराला हाकलून देण्यात आले व कुलूप लावून घेण्यात आले. 19 मे रोजी तक्रारदार व साक्षीदार बैठकीकामी म्युन्सीपल पार्क भागातील ईमारतीत गेल्यानंतर संशयीतांनी यापुढे या ठिकाणी यायचे नाही, आल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी सुराणा यांनी शहर पोलिसात तक्रार अर्ज दिला होता व त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अर्जावरून सोमवारी दुपारी नऊ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नऊ संशयीत : चौकडी जाळ्यात
संजय सुराणा यांच्या फिर्यादीवरून संशयीत अ‍ॅड.दिलीप भालचंद्र पंडित, ईकबाल बुद्धू गवळी, सईद कालू गवळी, हसीना सईद गवळी, गंगुबाई कालू गवळी, जाफर कालू गवळी, जुबेदा जाफर गवळी, अफजल कालू गवळी, बानो अफजल गवळी यांच्याविरोधात दंगल व जमावबंदी कायद्याचे उल्लंघण यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत ईकबाल गवळी, सईद कालू गवळी, जाफर गवळी, अफजल गवळी यांना अटक करण्यात आली असून अन्य संशयीत पसार झाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !