भुसावळात गुप्ती बाळगून दहशत : संशयीत जाळ्यात
Terror by keeping secret in Bhusawal : in the net of suspicion भुसावळ : धारदार गुप्ती बाळगून दशहत निर्माण करणार्या संशयीताला जुन्या लिंबू मार्केट परिसरातून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. शेख समीर शेख सलीम (21, पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेेतील संशयीताचे नाव आहे. शहरातील जुन्या लिंबू मार्केट परिसरात संशयीत शेख समीर शेख सलीम (21, पंचशील नगर, भुसावळ) हा लोखंडी धातूची गुप्ती (धारदार चाकू) बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती व त्यानुसार रविवार, 2 जून रोजी रात्री 10.45 वाजता संशयीताला अटक करण्यात आली.
कॉन्स्टेबल सचिन यशवंत चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.

