भुसावळात दुचाकीला आग : सुदैवाने अनर्थ टळला


भुसावळ : भुसावळ शहरात दुचाकीच्या बॅटरीतून धूर येत असल्याने वाहनधारकाने वेळीच दुचाकी थांबवत पाण्याचा मारा केल्याने अनर्थ टळला. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दुचाकी (एम.एच.19 बी.पी.1755) मधून धूर निघू लागल्याने वाहनधारकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.

यावेळी पालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या बंबाला पाचारण करण्यात आल्यानंतर तत्काळ गाडीवर पाण्याचा मारा करण्यात आल्याने धूर बंद झाला. दुचाकीतून धूर निघत असल्याने संबंधित गाडी चालकाने बॅटरीकडील वायरिंगचा बॉक्स ओपन केला व पाणी मारल्याने मोठाच अनर्थ टळला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !