डांभूर्णीतील 41 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील 41 वर्षीय महिलेने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना 13 मे रोजी घडली होती. महिलेला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान महिलेचा 21 मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नानकीबाई नरसिंग बारेला (41) असे मयताचे नाव आहे.

विषारी पदार्थ सेवन करीत केली आत्महत्या
नानकीबाई या महिलेने 13 मे रोजी दुपारी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा ्रप्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान या महिलेचा 21 मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवार, 5 जून रोजी यावल पोलीस ठाण्यात डॉ.निखील तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !