भुसावळ शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम


भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे. शहरातील म्युन्सीपल हायस्कूल व गायत्री झेराक्सच्या गल्लीतून चोरट्यांनी 17 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना 26 मे रोजी सकाळी 9.20 ते 10.20 दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विजय बाबूराव सरोदे (54, हनुमान नगर, अजनाडकर हॉस्पीटलसमोर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी म्युन्सीपल हायस्कूलजवळ दुचाकी (एम.एच.19 बी.के.1323) पार्क केली होती मात्र चोरट्यांनी भल्या सकाळीच संधी साधली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !