भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक : कर्जोदच्या वयोवृद्धाचा मृत्यू


रावेर : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या अपघातात कर्जोद येथील 60 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 9 रोजी सकाळी 11.30 जुन्या पातोंडी गावाजवळील रोडवर घडला. चुडामण लहानू भालेराव (60, कर्जोद, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.

ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा
अजय अशोक शिरतुरे (30, विवरा बु.॥, ता.रावेर) यांनी रावेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यासह चुडामण भालेराव हे दुचाकी (एम.एच.19 ईडी 7592) ने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर (एम.एच.29 आर.8902) ने कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर पडून तक्रारदार यांच्या हाता-पायाला ईजा झाली तर चुडामण भालेराव यांच्या डोक्याला मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शेख अलीम शेख सलीम (मदिना कॉलनी, रावेर) यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.


कॉपी करू नका.