म्हैसवाडी येथील शेतातून दहा केळीचे घड चोरी करताना दोघांना पकडले


यावल : यावल तालुक्यातील म्हैसवाडी या गावाच्या शिवारात शेत गट क्रमांक चारमध्ये दोन जण दुचाकी घेऊन चोरी करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी दहा केळीचे घड कापले व सुमारे चार क्विंटल केळी चोरी करतांना त्यांना पकडण्यात यश आले. ही घटना बुधवारी उघडकीस आली. दोघांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दोन दुचाकी व विळे आणि केळी हस्तगत करण्यात आली.

असे आहे चोरी प्रकरण
म्हैसवाडी, ता.यावल या गावात व्ही.जी.चौधरी यांचे शेत गट क्रमांक चार आहे. ही शेती मोहन देवराम कोल्हे (रा.बामणोद) यांनी भागीदारीने केली आहे. या शेतात त्यांनी केळी लागवड केली असून या केळीच्या शेतात बुधवारी सकाळी लखन दिलीप तायडे (33) व सागर मोतीराम तायडे (27, दोघे रा. पाडळसा, ता.यावल) हे मोटरसायकल (क्रमांक एम.एच. 19 ई.डी.1641) आणि (एम.एच.19 डी. एफ. 6020) घेऊन आले व त्यांनी शेतातून तब्बल चार क्विंटल वजनाचे 10 केळीचे घड चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपुर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोन दुचाकी, दोन विळे, केळी असा मुद्देमाल जप्त केला. फैजपूर पोलीस ठाण्यात शेतातील रखवालदार सुखदेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !