भुसावळातील विनयभंगाच्या गुन्ह्यात करण व विष्णू पथरोडला अटक

एका संशयीताची नंदुरबार कारागृहात रवानगी तर सरकारी कामात अडथळ्याच्या गुन्ह्यात


One suspect sent to Nandurbar Jail for obstruction of government work भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या खून प्रकरणी अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेले संशयीत करण पथरोड व विष्णू पथरोड यांना भुसावळ शहर पोलिसात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

न्यायालयाबाहेर प्रचंड बंदोबस्त
संशयीतांना प्रचंड बंदोबस्तात भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयीत विष्णू पथरोड विरोधात शहर पोलिसात सरकारी नोकराच्या कामात अडथळा आणल्याचा भादंवि 353 अन्वये गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात त्यास पुन्हा शहर पोलिसांनी अटक केली तर संशयीत करण पथरोड याची बंदोबस्तात नंदुरबार कारागृहात रवानगी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

अटकेतील विष्णू पथरोड यास शनिवारी पुन्हा प्रचंड बंदोबस्तात भुसावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील बंटी पथरोडसह अन्य पसार संशयीतांचा अद्यापही पोलिसांकडून शोध कायम आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !