जळगावात 19 जूनपासून पोलीस भरती : जिल्ह्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर


Police recruitment in Jalgaon from June 19: First time use of electric chip in the district जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात 137 जागांसाठी सहा हजार 557 अर्जदार पात्र ठरले आहेत. 19 जूनपासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होईल. 25 जूनपर्यंत चाचण्या पूर्ण होतील. यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. शारिरीक चाचणीच्या अचून नोंदीसाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर केला जाणार असून त्यामुळे वेळेत थोडीदेखील तफावत राहणार नसल्याची माहिती जळगाव जिल्हा पोली अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

137 जागांसाठी पोलीस भरती
पोलीस भरतीची माहिती देण्यासाठी शनिवारी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात 137 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी बुधवार, 19 जूनपासून शारिरीक चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना पोलीस कवायत मैदानाजवळ हजर रहावे लागणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवार, 19 रोजी 500 पुरुष उमेदवार, दुसरा दिवस 20 जून दरम्यान प्रत्येक दिवशी ते 23 ते एक हजार उमेदवारांना तर 24 रोजी 724 उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर 25 जून रोजी एक हजार 362 महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारांची शारिरीक चाचणी होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.



डॉक्युमेंट तपासणीनंतर मिळणार चेस्ट क्रमांक !
प्रत्येक दिवशी आलेल्या उमेदवारांना प्रथम वाहतूक शाखेनजीक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर 50-50 जणांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन मूळ कागदपत्रे (ओरिजनस डॉक्युमेंट) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक दिला जाणार आहे.

प्रलोभलांना बळी पडू नका
पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या निगराणीत केली जाणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. पोलीस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व त्यांच्या प्रलोभलांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

अर्जामध्ये 20 टक्के महिलांचा समावेश !
भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास त्याचे पहिले अपील उपविभागीय अधिकार्‍यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलीस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. एकूण अर्जामध्ये 20 टक्के महिलांचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !